ऑनलाइन सुरक्षित राहा

ऑनलाइन सुरक्षिततेबद्दलचे एक चित्र

ऑनलाइन नवीन लोकांना भेटणे रोमांचक असू शकते, पण त्यात काही आव्हानेही असतात. गोष्टी पुढे नेण्यापूर्वी एखाद्याला जाणून घेण्यासाठी ॲपमधील मोफत सुविधा, जसे की व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, वापरून स्वतःचे संरक्षण करा.

⚠️ लक्ष ठेवण्यासारखे 3 धोक्याचे संकेत:

1. फोन नंबरची मागणी

जोडी जुळताच तुमचा फोन नंबर मागणे. ॲपमध्ये गप्पा आणि व्हॉइस/व्हिडिओ कॉल मोफत आहेत, म्हणून स्वतःला विचारा: त्यांना तुमचा खासगी फोन नंबर कशासाठी हवा आहे?

2. दुसऱ्या ॲपवर जायला सांगणे

तुम्हाला दुसरे एखादे ॲप (उदा. Telegram) किंवा एखादे अनोळखी ॲप डाउनलोड करायला सांगणे, जिथे त्यांच्यावर बंदी येण्याची शक्यता कमी असते, आणि मग संभाषण तिथेच नेण्याचा आग्रह धरणे. सावध राहा: तुम्हाला सुरक्षा सुविधांपासून दूर नेण्याची ही एक युक्ती असू शकते.

3. दबाव किंवा जबरदस्ती

तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्यासाठी तुमच्यावर दबाव आणणे, उदा. तुम्ही “नाही” म्हटल्यानंतरही वारंवार अश्लील फोटो मागणे. जर कोणी तुमच्या मर्यादांचा किंवा गोपनीयतेचा आदर करू शकत नसेल, तर पुढे इतर बाबतींतही ते तुमचा आदर करतील याची शक्यता कमी आहे.

💡 लक्षात ठेवा: तुमच्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा. एखाद्याची तुमच्या मित्रांशी किंवा कुटुंबाशी ओळख करून देताना तुम्हाला अवघडल्यासारखे वाटणार असेल, तर कदाचित गोष्टी पुढच्या टप्प्यावर नेण्याची ही वेळ अजून आलेली नाही.

तुमची सुरक्षितता नेहमीच सर्वात आधी.

Download

qr-code
appstore playstore
mobile-app-img

Socials

facebook instagram linkedin twitter tiktok
-->

We use cookies to enhance your browsing experience, serve personalized ads or content, and analyze our traffic. (View Cookie Policy)